• Home
  • होम
  • मंगळवेढा येथे ट्राफिक पोलिसांचा वाहन चालकांना मानसिक छळ
Image

मंगळवेढा येथे ट्राफिक पोलिसांचा वाहन चालकांना मानसिक छळ

नियमीत कागदपत्रे असतानाही कारवाईचा प्रयत्न

मंगळवेढा (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र शासनाच्या ट्राफिक पोलिसांकडून वाहन चालकांकडून पैशांची वसुली करण्याच्या उद्देशाने वाहने अडवण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. याच संदर्भात एक घटना मंगळवेढा ते मरवडे रोडवर घडली.शिवसेना जिल्हा प्रमुख (OBC/VJNT) परभणी, मा. श्री. मदन रेनगडे यांची चारचाकी गाडी क्रमांक MH14EC4204 ही रिलायन्स पेट्रोल पंपापासून अंदाजे 500 मीटर अंतरावर ट्राफिक पोलिसांनी अडवली. विशेष म्हणजे, त्यांच्या गाडीची सर्व कागदपत्रे योग्य व वैध असूनही, त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला.गाडीचे संपूर्ण दस्तऐवज आणि नियमांचे पालन असूनही, ट्राफिक पोलिसांनी विनाकारण वेळ खर्च करून मानसिक त्रास दिला. हे सर्व पैशांची मागणी करण्याच्या हेतूने होत असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे.या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी असून, पोलिसांकडून होत असलेल्या गैरवर्तनाविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे. शासनाने अशा प्रकारांवर लक्ष घालून, सामान्य नागरिकांना आणि वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Releated Posts

GT vs MI IPL 2025 : ‘मुंबई’वर गुजरातच भारी! हार्दिक पांड्याच्या टीमचा ‘लाजेलाही लाजवणारा’ लाजिरवाणा पराभव

Gujarat Titans vs Mumbai Indians, 9th Match : गुजरात टायटन्सने अखेर आयपीएल 2025 मध्ये आपले खाते उघडले. अहमदाबादमध्ये…

ByBypujariam99@gmail.comMar 30, 2025

राज्यात पुरुष आयोगाची स्थापना करावी – आकाश पुजारी

राज्यामध्ये अनेक लोकांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. अनेक प्रकरणांमध्ये कारण नसताना पुरुषांना अडकवले जात आहे. पुरुषांचे…

ByBypujariam99@gmail.comMar 30, 2025

कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार

ठाणे : जिल्ह्याच्या कल्याण आंबिवली परिसरामध्ये राहणाऱ्या इराणी वस्तीमधील एका चोराचा चेन्नईमध्ये एन्काऊंटर (Encounter) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

ByBypujariam99@gmail.comMar 30, 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top