ठाणे : जिल्ह्याच्या कल्याण आंबिवली परिसरामध्ये राहणाऱ्या इराणी वस्तीमधील एका चोराचा चेन्नईमध्ये एन्काऊंटर (Encounter) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विमानाने परदेशात जाऊन दरोडे टाकण्याचं काम एका टोळीकडून व्हायचं, या टोळीत हा चोरटाही असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. चेन्नई पोलिसांनी या टोळीतील एकाचा एन्काऊंटर केला असून दोघेजण गंभीर जखमी आहेत. विविध गुन्ह्यामध्ये पोलिसांच्या (Police) रेकॉर्डवर असलेले हे गुन्हेगार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्यापैकी, जाफर गुलाम इराणी या चोराचा पोलिसाच्या चकमकीत एन्काऊंटर झाल्याची माहिती आहे.
कल्याण आंबिवली परिसरामध्ये इराणी वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे, या इराणी वस्तीमध्ये चैन स्नॅचिंगसह चोऱ्या करणाऱ्या आरोपीचं माहेरघर हे आंबिवली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी या चोरांच्या मुसक्या आवळल्या असून अनेकांना तुरुंगातही टाकले आहे. मात्र, हे चोर परराज्यात विमानाने प्रवास करत चोऱ्या करत असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. सलमान मेश्राम, अमजद इराणी, जाफर गुलाम हुसेन इराणी हे तिघे महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये विमानाने जाऊन चोऱ्या करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान,
मंगळवारी चेन्नईमध्ये हे आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने गेले असताना पोलिसांच्या झडापटीत एकाचा एन्काऊंट करण्यात आला. चेन्नईमधून तब्बल दहा किलो सोन्याची चोरी करुन जात असताना चेन्नई पोलिसांच्या झटापटीमध्ये जाफर गुलाम इराणी या चोराचा चेन्नई पोलिसांनी एन्काऊंटर करण्यात आला. तर, या झटापटीत सलमान मेश्राम आणि अमजद इराणी हे दोघे जखमी झाले आहेत.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.