नांदेड (प्रतिनिधी) : सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ॲड. आकाश पुजारी यांचा नांदेड येथे विशेष सत्कार करण्यात आला. नांदेड दौऱ्यावर आले असता पोलीस उपनिरीक्षक श्री. बालाजी किरवले यांनी त्यांचे स्वागत करून सन्मान केला.
या प्रसंगी विविध सामाजिक व साहित्यिक विषयांवर चर्चा झाली. समाजहिताच्या कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या पाठिशी राहण्याचा मानस श्री. किरवले यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यातील सामाजिक चळवळींसाठी ॲड. आकाश पुजारी यांना त्यांनी विशेष शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख मदनजी रेनगडे पाटील, माजी सरपंच हनुमंत व्हनाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते