महाराष्ट्रातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट मराठीतून असाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आकाश पुजारी यांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्राचा एक जबाबदार नागरिक म्हणून मंत्री उदय सामंत यांच्याकडे महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी भाषेच्या जपणुकीसाठी राज्यातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट मराठीतून असाव्यात असेही सांगितले.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून, ती अधिकृत स्वरूपात वाहन क्रमांकावर दिसणे आवश्यक आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना नंबर वाचण्यास सोपी होईल तसेच राज्याच्या संस्कृतीचा अभिमान वृद्धिंगत होईल.
तरी याबाबत शासन स्तरावर विचार करून आवश्यक आदेश द्यावेत अशी विनंती आकाश पुजारी यांनी केली