नियमीत कागदपत्रे असतानाही कारवाईचा प्रयत्न
मंगळवेढा (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र शासनाच्या ट्राफिक पोलिसांकडून वाहन चालकांकडून पैशांची वसुली करण्याच्या उद्देशाने वाहने अडवण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. याच संदर्भात एक घटना मंगळवेढा ते मरवडे रोडवर घडली.शिवसेना जिल्हा प्रमुख (OBC/VJNT) परभणी, मा. श्री. मदन रेनगडे यांची चारचाकी गाडी क्रमांक MH14EC4204 ही रिलायन्स पेट्रोल पंपापासून अंदाजे 500 मीटर अंतरावर ट्राफिक पोलिसांनी अडवली. विशेष म्हणजे, त्यांच्या गाडीची सर्व कागदपत्रे योग्य व वैध असूनही, त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला.गाडीचे संपूर्ण दस्तऐवज आणि नियमांचे पालन असूनही, ट्राफिकपोलिसांनी विनाकारण वेळ खर्च करून मानसिक त्रास दिला. हे सर्व पैशांची मागणी करण्याच्या हेतूने होत असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे.या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी असून, पोलिसांकडून होत असलेल्या गैरवर्तनाविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे. शासनाने अशा प्रकारांवर लक्ष घालून, सामान्य नागरिकांना आणि वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.